गणेश कॉलनीत विक्रेत्यांवर कारवाई

0

जळगाव– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र गणेश कॉलनी परिसरात फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे मनपाच्या पथकाने विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली आहे.
लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र कुठेही दुकान थाटून गर्दी केली जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गणेश कॉलनी परिसरात शुक्रवारी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई मुख्य लेखापरीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे, अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या पथकाने केली आहे.

Copy