Private Advt

गणेश कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरातील गणेश कॉलनीतील साईबाबा मंदिरासमोरून तरुणाची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीचे सत्र कायम
अमोल मुरलिधर चौधरी (39, गणेश कॉलनी रोड, साईबाबा मंदिरासमोर जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून शुक्रवार, 20 मे रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.एच. 1908) पार्किंग केली असता चोरट्यांनी ती लांबवल्याची बाब मंगळवार, 24 मे रोजी रात्री 8 वाजता उघडकीस आला. मंगळवार, 24 मे रोजी दुपारी अमोल चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रतिभा पाटील करीत आहे.