गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास एसटीची व्यवस्था; परिवहन मंत्र्यांची घोषणा

0

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अटी-शर्तींवर ही परवानगी देण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केली आहे.

अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून ही माहिती दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. अटी शर्ती आणि नियमांचे पालन करूनच ही व्यवस्था करून देण्यात येणार असून एसटीने कोकणात जाण्यासाठी काय नियम असतील याची माहिती लवकरच देण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. यंदा करोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. कोकणात गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा होईल. गर्दी होणार नाही आणि पर्यायाने कोकणात करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबतही विचार करण्यात येत आहे.

Copy