Private Advt

गणेशवाडी भागातील तरुणीचा लॅपटॉप चोरट्यांनी लांबवला

जळगाव : शहरातील गणेशवाडी भागातील तरुणीचा 30 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी घरातून लांबवला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

घरातून लांबवला लॅपटॉप
हर्षदा सुनील चिंचोले (25, गणेशवाडी, जळगाव) ही तरुणी खाजगी नोकरीला आहे. त्यांच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचा अ‍ॅप्पल कंपनीचा लॅपटॉप असून गुरूवार, 12 मे रोजी सकाळी 8 ते 8.30 या दरम्यान त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 30 हजार रुपये किंमतीचा मिनी लॅपटॉप चोरून नेला. हर्षदा चिंचोले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सोनार करीत आहे.