Private Advt

गणपूर शिवारात उसाला आग : 16 लाखांचे नुकसान

चोपडा : चोपडा तालुक्यातील गणपुर शिवारात विद्युत तारांच्या घर्षणामुळे शेतातील उभ्या उसाला अचानक आग लागल्याने सुमारे 16 लाखांचे नुकसान झाले. या घटनेने शेतकर्‍याला मोठा मानसिक धक्का बसला असून प्रशासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासह भरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.