गणपती बाप्पा मोरया ऽऽ पुढच्या वर्षी लवकर या !

0

रावेर शहरात शांततेत बाप्पांचे विसर्जन

रावेर- शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची आरती करून पाराच्या गणपतीपासून सुरुवात झाली. यावेळी गणेश भक्तांकडून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जलघोष करण्यात आला तर ढोल-ताशांच्या गजरात लेझीम खेळत मिरवणुकीला सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे नागझिरी कुंडात तर अन्य खाजगी मंडळांनी नांदूपिंप्री पुलावरून तसेच अभोडा, लालमाती, पिंप्री धरणासह तापी नदी पात्रात भक्तीभावाने विसर्जन केले.

लेझीम नृत्याला रावेरकरांची उत्स्फूर्त दाद
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत शिवाज्ञा व्यायाम शाळा, शिवराणा व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, प्रताप व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, सिध्दीविनायक व्यायाम शाळा, पवन व्यायाम शाळा, रोकडा हनुमान व्यायाम शाळा, गजानन व्यायाम शाळेच्या मल्लांनी लेझीम खेळत रावेरकरांची मने जिंकली. देशमुख वाडा गणेश मंडळ, चितोडे वाणी गणेश मंडळ, राजे संभाजी गणेश मंडळ, शिवराय गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, अंबिका गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी लेझिम मंडळ यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह लेझिम पथक सहभागी झाले होते.

शांततेत झाले गणेश विसर्जन
शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार विजयकुमार ढगे, डॉ.बी.बी.बारेला, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भास्कर महाजन, नगरसेवक सुधीर पाटील, राजेंद्र महाजन, अशोक शिंदे, डी.डी.वाणी, अशोक वाणी, गयास महाजन, यूसुफ मेंबर, आसीफ मेंबर आदींनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.

Copy