गंभीर आजार असणार्‍यांवर आता प्रशासनाचा फोकस

0

प्रांताधिकार्‍यांकडून पालिका कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

फैजपूर : यावलसह रावेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता गंभीर आजार असलेल्या नागरीकांचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यासाठी फैजपूर पालिकेच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन
फैजपूर विभागातील शहरासह आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला व या आजाराला वयोवृद्ध व गंभीर आजार असलेले नागरिक बळी पडत आहे. त्यामुळे अशा वयोवृद्ध तसेच गंभीर आजार असलेल्या नागरीकांची तपासणी करणे त्यांचे ऑक्सिजन लेव्हल तपासणे, ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त आढळल्यास उपचार पद्धती सांगणे अशा व्यक्तींचे समुपदेशन करणे या संदर्भात प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन केले व यावेळी कर्मचार्‍यांचे मनोधैर्य वाढवले.

Copy