गंगापूरजवळ रीक्षा उलटून चालकाचा मृत्यू : अन्य प्रवासी जखमी

0

नवापूर- गंगापूर गावाजवळ सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्ग क्रमांक सहावर रीक्षा उलटून एकाचा मृत्यू झाला. चिंचपाड्याकडून विसरवाडीकडे नादुरुस्त रिक्षाला टोचण करून नेले जात होते. त्या वेळी रीक्षा (क्र.एमएच 39, जे 2247) उलटली. या अपघातात रीक्षा चालक मोसीन युसूफ शेख (वय 26, रा. विसरवाडी) व रमेश जेनत्या गावित (वय 35, रा. बोदवड) जखमी झाले. मोसीन शेख याच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाले होते. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी आहेत.

Copy