खेळाडूंनी मैदानाकडे वळण्याची आवश्यकता

0

भुसावळ । शरीर सुदृढ रहावे, सुप्त गुणांना वाव मिळावे व तरुण पिढीने घरगुती खेळ सोडून मैदानी खेळांकडे वळावे जेणेकरुन शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदरुस्त राहण्यास मदत मिळेल. खेळात जय पराजय हे खेळाचेच भाग असून खेळाडूवृत्तीने ते स्विकारावे व स्पर्धा शांततते पार पाडण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी केले. ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित मानाच्या सरपंच चषकाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व चेंडू टोलवून उपविभागीय पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब गायधनी, भुसावळ मंडळ रेल्वे स्पोर्ट्स सचिव विवियन रॉड्रीक्स, सरपंच आनंद ठाकरे, उपसरपंच शकील पटेल, निवृत्ती पवार, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, रविंद्र पाटील, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, प्रविण पवार, विजय पाटील, अनंता भिल, संतोष भोळे, सुरेश पाटील, धनराज भोई, नरेंद्र पाटील, सुभाष कोळी, संतोष कोळी, विलास ठोके, अजय चौधरी, राहूल चौधरी, प्रमोद चव्हाण, जितेंद्र पाटील, नाना सोनवणे आदी उपस्थित होते.

एकूण 18 संघांनी घेतला सहभाग
या स्पर्धेत एकूण स्थानिक 18 संघांनी सहभाग घेतला असून प्रथम सामना योध्दा विरुध्द राईसिंग स्टार यांच्या झाला. हा सामना योध्दा ने 4 गडी ने जिंकला. दुसरा सामना जय श्रीराम -2 विरुध्द दोस्ती यांच्या झाला हा सामना जय श्रीराम- 2 ने जिंकला. तिसरा अत्यंत चुरशीचा सामना नवनाथ विरुध्द ए.एन. संघात झाला हा सामना व नवनाथ संघाने 7 गडी राखून जिंकला. सामन्यात पंकज या खेळाडून 3 षटकार मारल्याने त्याला रोख 1 हजार 200 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत समालोचन म्हणून रमजान पटेल, गुणलेखक राजू भोईटे, प्रतिक कुळकर्णी, तारेख पटेल यांनी काम पाहिले. तर पंच म्हणून राहूल कोळी, चेतन वानखेडे, प्रतिक कुळकर्णी यांनी परिश्रम घेतले.

मातृभूमी, जय महाराष्ट्रात सामना
सोमवार 16 रोजी सकाळी 10 वाजता 2015 चे विजेता व 2016 चे विजेते जय महाराष्ट्र या संघात सामना होणार आहे. स्पर्धेचे हे मुख्य आर्कषण आहे. या शिवाय तीन सामने होणार आहे. प्रसंगी गावातील नागरिकांनी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित केले.