Private Advt

खेर्डीतील 38 वर्षीय शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील खेर्डी खुर्द येथील 38 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोपीचंद भास्कर पाटील (38) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चाळीसगाव तालुक्यातील खेर्डी खुर्द येथील शेतकरी गोपीचंद भास्कर पाटील (38) यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून त्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते शनिवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहा.निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करीत आहेत.