खुशखबर: या दिवशी येणार भारतातील पहिली कोरोना लस

0

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला पूर्ण अटकाव घालण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लस. मात्र आजपर्यंत कोणत्याही देशाला लस विकसित करून बाजारात आणण्यात करण्यात यश आलेले नाही. रशियाने लस विकसित केलेली आहे, मात्र अद्याप ती बाजारात उपलब्ध झालेली नाही. भारतीय स्वदेशी बनावटीच्या लसीची मानवी चाचणी झाली आहे. मानवी चाचणीचे परिणाम सकारात्मक आले आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांसाठी एक खूशखबर येणार आहे. येत्या ७३ दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोविड-१९ आजारावरील भारताची पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या लसीवर काम करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकार याचे मोफत लसीकरण करणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे.

पहिला डोस हा काल शनिवारी (२२ ऑगस्ट) त्यानंतर दुसरा डोस हा २९ दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या १५ दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर ‘कोविशिल्ड’ लस बाजारात आणण्याचा विचार सुरु आहे.

या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला भारतातील २० केंद्रांवर शनिवारपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत तर गुजरातमधील अहमदाबाद येथे याची चाचणी होत आहे. या टप्प्यात १,६०० लोकांवर याची चाचणी होणार आहे.