खुनाच्या गुन्ह्यात पसार झालेले संशयीत बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळात डीबी पथकाने आवळल्या मुसक्या : न्यायालयाने काढले होते वॉरंट

भुसावळ- खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी न्यायालयीन तारखांवर हजर राहत नसल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने पकड वॉरंट जारी केल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने आरोपींना अटक केली. खटला क्रमांक 27/2016 मधील आरोपी पिदा उर्फ आकाश शाम जाधव (28, रा.वाल्मिक नगर) व केस क्रमांक 328/14 मधील आरोपी नामे शेख हमीद शेख शमशोद्दीन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तस्लीम पठाण,
सहाय्यक फौजदार शकील शेख, बोडदे, गुलबक्ष तडवी, सचिन चौधरी, प्रशांत चौधरी, उमाकांत पाटील, राहुल चौधरी आदींनी ही कारवाई केली.

Copy