खिर्डी-बलवाडी रस्त्यावर ट्रक उलटला

0

खिर्डी : खिर्डी-बलवाडी रस्त्यावर केळी वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही. केळीचा वाहून नेणारी आयशर (यु.पी.80 ई.टी.8230) ला समोरून येणार्‍या ट्रकने कट मारल्याने ती रस्त्यावर उलटली तर या अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. क्रेन बोलावल्यानंतर रस्त्यावर वाहन बाजूला करण्यात आले.

Copy