खिर्डीतील राजकन्याने काढले पेन्सिलने मनमोहक चित्र

0

खिर्डी : तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच रावेर तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांची मुलगी राजकन्या उर्फ (राजश्री) गुणवंत पाटील हिने पेन्सिलने विविध प्रकारचे चित्र बनवले आहे. सध्या राज्यात व देशात लॉक डाऊन असल्यामुळे सर्व शाळांना सुट्या असून शाळेतील विद्यार्थी घरीच ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करीत आहेत. राजकन्याने लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आपल्या वेळेचा पूर्णपणे उपयोग करून जवळपास दीडशे (150) विविध प्रकारचे चित्राचा संग्रह केला आहे व या काळात तिने अभ्याससोबतच तिचा आवडत्या विषय म्हणजे चित्रकलेत पूर्णपणे रुची दाखविली आहे. घरातच विविध महापुरूषांचे व इतर वस्तूचे मनमोहक चित्र काढले आहे. तिच्या या उपक्रमाचे खिर्डीकरांनी कौतुक केले आहे.

Copy