खिर्डीतील तत्पर फाउंडेशनतर्फे परप्रांतीय मजुरांना मदतीचा हात

0

खिर्डी : तत्पर फाउंडेशनतर्फे मध्यप्रदेशाकडे एस.टी.ने निघालेल्या परप्रांतीय मजुरांना खाद्य पदार्थ देवून मदतीचा हात देण्यात आला. लॉकडाऊनमुळे मजल-दरमजल करीत घराकडे निघालेल्या मजुरांसाठी राज्य शासनाने बस सेवा सुरू केली असून दररोज अनेक बसेस या मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर चोरवड बॉर्डरपर्यंत मजुरांची मोफत वाहतूक करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर परीसरातील सामाजिक संस्था अन्नदाता म्हणून समोर येत आहे. अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान असल्यानेच हाच विचार डोळ्यापुढे ठेवून खिर्डीतील तत्पर फाउंडेशन या सामाजिक सामाजिक संस्थेतर्फे बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील निंभोराजवळ एस.टी बस ने जाणार्‍या मजुरांना खाद्यपदार्थ व इतर वस्तू मदत म्हणून वाटप करण्यात आल्या. संस्थेच्या या कार्याचे परीरात कौतुक होत आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थाध्यक्ष गुणवंत पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी, सचिव प्रवीण धुंदले, सदस्य कांतीलाल गाढे, सतीश फेगडे, प्रदीप महाराज, शेख इद्रीस, रीतेश चौधरी, संकेत पाटील, सादीक पिंजारी, अंकित पाटील, पोलिस पाटील प्रदीप पाटील, राजू महाजन, विनाय कजहुरे, ईरफान बेग, मयूर शिरनामे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

Copy