खा. सुप्रिया सुळे यांचा शेंदुर्णी, पाचोर्‍यात मेळावा

0

विद्यार्थिनी, महिलांसह, डॉक्टर, वकिलांशी साधणार संवाद
शेंदुर्णी/पाचोरा- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी व पाचोरा येथे महिला मेळाव्याचे शनिवारी 13 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शेंदुर्णी येथे महिला संवाद यात्रेनिमित्त आचार्य गजाननराव गरूड महाविद्यालयात दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणवर युवती व महिला या मेळाव्यात सहभागी होणार असून खासदार सुप्रिया सुळे या महिलांचे प्रश्‍न समजून घेणार आहेत. यासह डॉक्टर वकिल, प्रगतिशील शेतकरी यांच्याशी त्या संवाद साधना आहेत. जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व अप्पासाहेब र. भा. गरूड महाविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पाचोर्‍यात सांधणार संवाद
खासदार सुप्रिया सुळे या शनिवारी सकाळी प्रथम एमएम महाविद्यालयात सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहे. यानंतर प्रसाद हॉल येथे डॉक्टर, वकिल, इजिनिअर यांच्याशी संवाद साधून यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सरपंच महिला, पदाधिकारी यांचा मेळावा घेणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष सतिश चौधरी, महिला तालुकाध्यक्ष सरला पाटील यांनी केले आहे.

Copy