खा. संजय राऊतांची ट्वीटर द्वारे पुन्हा एकदा विरोधकांवर टीका

0

मुंबई: राज्यात हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधात बोलणाऱ्यांवर टीका करत ट्वीटर वर शायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष केले आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यात संजय राऊत यांची मोलाची भूमिका होती. भाजपाच्या नेत्यांकडून संजय राऊतांच्या भूमिकेमुळे युती तुटली असल्याचे आरोप करण्यात आले होते.

आपल्या ट्वीट मध्ये संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, इरादे हमेशा मेरे साफ होते हैं, इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है म्हणत पुन्हा एकदा शायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. याआधी देखील संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर शेरो-शायरीतून भाजपावर टीकास्त्र सोडले होते. त्याचप्रमाणे भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे भाजपा व शिवसेनेच्या युतीमध्ये फूट पडली असल्याचे आरोप करण्यात येत होते. भाजपाच्या या आरोपांवर दोस्तों में मशहूर हुए तो क्या मज़ा, मज़ा तो तब है जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो असं म्हणत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते.

नागपूरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनेच्या रणनितीबाबत महाविकासआघाडीची आज बैठक होणार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते व आमदार उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Copy