खा. डॉ.हिना गावित यांच्याकडून कोरोनाग्रस्तांसाठी १ कोटीची मदत

0

नवापूर। नंदुरबार जिल्ह्यातील खासदार डॉ.हिना गावित यांनी कोरोनाग्रस्तांसाठी १ कोटी रुपये दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार खा.डॉ.हिना गावीत यांनी आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून एक कोटी रुपये दिले. अशा आशयाचे पत्र नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांना खा.डॉ. हिना गावित यांनी दिले. तसेच डॉ.विजयकुमार गावीत व खा.डॉ.हिना गावीत यांनी आपले एक महिन्याचे वेतन एक लाख रुपये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी पंतप्रधान सहायता निधीत दिले आहे.

Copy