खासदार रक्षा खडसे यांना पुरस्कार जाहीर

0

मुक्ताईनगर । एलसोल रिसर्च ट्रेंड अँड कन्सल्टिंग आणि हेराल्ड ग्लोबलतर्फे खासदार रक्षा खडसे यांना यंदाचा सर्वात प्रभावी महिला नेतृत्व पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला नेतृत्व परिषदेमध्ये समाजासाठी भरभरून योगदान देणार्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 50 प्रेरणादायी महिलांचा सर्वात प्रभावी महिला नेतृत्व 2017 हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. मुंबईत 20 जानेवारी 2017 रोजी होणार्या या भव्य समारंभात खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत नेमबाज अंजली भागवत, टीव्ही प्रोड्युसर मंजिरी प्रभू, अभिनेत्री काजल अग्रवाल, अभिनेत्री रविना टंडन, अभिनेत्री हनी इराणी, अभिनेत्री अमृता राव, फॅशन डिझायनर अना सिंग, एसएनडीटीच्या कुलगुरू शशिकला वंजारी, गिर्यारोहक कृष्णा पाटील, फॅशन डिझायनर नीता लुल्ला, दिग्दर्शिका अरुणा राजे, टीव्ही अभिनेत्री निमिषा वखरिया, टीव्ही अभिनेत्री आसावरी जोशी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायिका मोना शेट्टी, गायिका गीता खन्ना, अभिनेत्री पल्लवी जोशी, इशा कोप्पीकर, अभिनेत्री स्मिता जयकर, टीव्ही निवेदिका मिनी माथूर यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.