खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

0

भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी येथे सामाजिक सभागृह, पिंपळगाव खुर्द येथे पिंपळगाव ते जानोरी रस्त्यावर मोरी, वरणगाव ते फॅक्टरी डांबरीकरण, साकरी ते जाडगाव डांबरीकरण, शिंदी येथे सामाजिक सभागृह, कन्हाळे बु. येथे काँक्रीटीकरण अशा विविध कामाचे भुमिपुजन खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती मुरलीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील, वरणगाव नगराध्यक्षा अरूणा इंगळे, गटनेते सुनिल काळे, तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील भाजपा तालुका सरचिटणीस नारायण कोळी, शिंदी सरपंच लीना महाजन, साकरी सरपंच कांचन भोळे, उपसरपंच दिलीप फालक आदी उपस्थित होते.