खासदार रक्षा खडसे यांच्याकडून एक कोटीची मदत

0

जळगाव। रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी कोरोना या संसर्गजन्य आजारासाठी एक कोटी रुपयांची मदत सरकारकडे जमा केली आहे. सध्या कोरोना या आजाराने देशासह राज्यभरात खळबळ माजवली आहे.

केंद्र सरकार राज्य शासनामार्फत
नागरिकाच्या सोयी सुविधासाठी विविध योजनाच्या माध्यमातून गरज भागविण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तीकडून आर्थीक मदत सरकारकडे जमा करण्यात येत आहे. आपणही समाजाचे देण लागतो या भावनेतून प्रत्येक जण मदत करीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून एक कोटीची मदत सरकारकडे जमा केल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.