खासदार नवनीत कौर राणांना कोरोनाची लागण

0

अमरावती: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान आता अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या परिवारातील सदस्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज खासदार नवनीत राणा यानाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घरातील ११ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे.

४ दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची ७ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षीय मुलासह कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते. आमदार रवी राणा हे आई -वडिलांना घेऊन नागपूर येथे होते, खासदार नवनीत राणा या मुलामुलींची काळजी घेण्यासाठी घरीच होत्या. नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली होती.रॅपिड अँटिजिन टेस्ट व थ्रोट स्वाब घेण्यात आले. रॅपिड टेस्ट मध्ये खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Copy