खासदार अमोल कोल्हे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

0

जुन्नर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोशल मीडियावरून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.अक्षय बोऱ्हाडे, सत्यशील शेरकर वादाचे पडसाद थांबण्याचे नाव घेत नसून या प्रकरणा वरूनच शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी शिर्डी येथील तीन जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियातील ‘देशमुख फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य’ या ग्रुपवर शिर्डीतील तिघांनी कमेंट केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण करणाऱ्याची गय केली जाणार नाही. डॉ. कोल्हे यांना शिर्डी येथे आल्यावर गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली आहे.

या प्रकारावरून नारायणगाव पोलिसांनी शिर्डी येथील तिघांवर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी डॉ. कोल्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Copy