खासगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय सोमवंशी यांची बहुमताने निवड

0

चाळीसगाव : जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असणार्‍या खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी येथील व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक अजय आनंदराव सोमवंशी यांची बहुमताने निवड झाली. शुक्रवारी पतसंस्थेच्या जळगाव येथील कार्यालयात झालेल्या निवडीत अजय सोमवंशी यांना 11 तर प्रतिस्पर्धी भुसावळ येथील रवींद्र केशव पाटील यांना सहा मते मिळाली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. सोमवंशी हे राष्ट्रीय सह. शिक्षक प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आनंदराव सोमवंशी यांचे चिरंजीव आहे. निवड झाल्यानंतर संचालक मंडळाने त्यांचा सत्कार केला. पारदर्शी कारभार, शिक्षकांच्या हितासाठी पतसंस्थेमार्फत आपण उपक्रम राबवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Copy