खासगी कार्यालये सुरु करण्यास परवानगी

1

मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून शिथीलता देण्यास राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारने खासगी कार्यालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. आदेशात खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत ८ जूनपासून कामकाज सुरु करु शकता असे आदेशात म्हटले आहे.
सर्व खासगी कार्यालये क्षमतेच्या १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकतात. इतर कर्मचार्‍यांना घरुन काम करावे लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल. जेणेकरुन कर्मचारी घरी परतल्यानंतर ज्यांना सहजपण लागण होऊ शकते त्यातही खासकरुन वृद्धांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

सम-विषय नियमाने दुकानांना परवानगी

दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका आयुक्तांवर असणार आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने सुरु राहतील असे आदेशात सांगण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची कामे यांचा यामध्ये उल्लेख आहे.

Copy