खान्देशात प्रथमच युवा नाट्य साहित्य संमेलनाचे आयोजन

0

विविध कलाकारांचा सहभाग

अमळनेर – खान्देशात प्रथमच न भूतो न भविष्य अशा युवा नाट्य साहित्य संमेलन २०१८ चे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा अमळनेर यांच्यातर्फे पूज्य साने गुरुजी नाट्य साहित्य नगरी (छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह) अमळनेर येथे २९, ३० रोजी संपन्न होत असल्याची माहिती आज येथील म.वा.मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती डिगंबर महाले यांच्या कडून देण्यात आली. सोबतच अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, कार्याध्यक्ष रमेश पवार, उपाध्यक्ष शरद सोनवणे, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, सदस्य संजय चौधरी, दिलीप सोनवणे उपस्थित होते.

यांची राहणार उपस्थिती
संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांच्याहस्ते होणार असून यास नाट्य व सिने अभिनेत्री वीणा जामकर, स्वागताध्यक्ष डिगंबर महाले, संमेलनाध्यक्ष जळगावचे रंगकर्मी हर्षल पाटील असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, जिल्हा प्रतिनिधी तानसेन जगताप, युवा नाट्य साहित्य संमेलन अमळनेरचे निमंत्रक प्रा.वि.दा.पिंगळे हे असणार आहे. खान्देशातील कलाकारांचा सहभाग असणार असून या संमेलनात रंगकर्मी यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.