खाकीतील माणुसकीचे दर्शन एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देणार

0

जळगाव। कोरोना सारख्या गंभीर महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व उपाय योजनेसाठी जळगाव पोलीस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे विनंतीपत्र जळगावचे पोलीस अधीक्षक यांना दिले असल्याचे सांगितले.या मदतीने खाकीतील माणुसकीचे दर्शन जळगाव जिल्ह्याला पहायला मिळाले आहे.