खाऊच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरणकर्त्या संशयिताचे छायाचित्र, रेखाचित्र जारी

0

जळगाव: जयपूर येथे जावयाचे असल्याने गाडीच्या प्रतिक्षेत कुटुंबिय जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर बसले होते. यादरम्यान पित्याला झोप लागली अन् त्याचा फायदा घेत संशयिताने पाच वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष देवून तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 16 जून रोजी 2019 घडलेल्या या घटनेत मुलीस घेवून जाणारा संशयित रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कैद झाला आहे. त्याचे सीसीटीव्ही छायाचित्र तसेच रेखाचित्र पोलिसांनी जारी केले असून संबंधित वर्णनातील संशयित अथवा चिमुकलीबाबत माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

16 जून रोजी 2019 ची घटना

याबाबत माहिती अशी की, 16 जून 2019 रोजी दुपारी 12.45 वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपुर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली. तर याच दरम्यान, संशयिताने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतले. यानंतर तिला सोबत घेवून संशयित गोवा एक्सप्रेसमध्ये बसून रवाना झाला. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

चिमुकलीसह संशयिताचे वर्णन असे
अपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तीची उंची 2 फुट 3 इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणार्‍या संशयिताचेही फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित सुमारे 35 ते 40 वयोगटातील आहे. त्यांची उंची 5 ते 6 फुट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. छायाचित्रातील चिमुकली अथवा संशयित याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी ०२५७-२२२१७९० आणि ९८२३०१९७११, ७०२१५०२३५५ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन  स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Copy