खरीपासाठी 2.74 लाख हेक्टर्स क्षेत्र निश्चित

0

नंदुरबार । राज्यशासन शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकर्‍यांच्याअडी-अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. आगामी खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्र 2 लाख 74हजार हेक्टर एवढे निश्चित करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना बि- बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना कोणत्याही अडचणी येता कामा नयेत. त्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्मनियोजन करावे.पेरणीचे उद्दीष्ट शंभर टक्के साध्य करण्यावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे दिले.

अधिकार्‍यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात आज दुपारी पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारीडॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे उपस्थित होते.