खरजईच्या बालिकेचा खदाणीत बुडून मृत्यू

0

चाळीसगाव- कपडे धुण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय बालिकेचा तरवाडे गावठाण शिवारातील खदाणीत पडल्याने पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. कोमल गुलाब वैराडे असे मृत बालिकेचे नाव आहे. कोमल ही आपलीआत्या निता यांच्यासोबत सकाळी कपडे धुण्यासाठी तरवाडे गावठाण शिवारातील खदाणीच्या ठिकाणी गेली होती. पाय घसरून खदाणीत पडली. याप्रकरणी गुलाब शंकर वैराळे यांच्या माहितीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमलच्या पश्चात आई, वडील व दोन बहिनी व आजी असा परीवार आहे.

Copy