खतांसाठी कृषी अधिकार्‍यांना घेराव

0

भुसावळ : रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई जाणवत असल्याने संतप्त भाजपा पदाधिकार्‍यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता महावीर कृषी केंद्रावर आलेलेया पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकार्‍यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. याप्रसंगी वरणगाव येथे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी चर्चा केली. भुसावळ तालुक्यात चार हजार टन खतांची मागणी असलीतरी प्रत्यक्षात केवळ एक हजार पाचशे टन खते उपलब्ध झाली असून अद्यापही अडीच हजार टन खतांची प्रतीक्षा आहे. पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

भाजप पदाधिकार्‍यांचे दोन तास जनआंदोलन
वरणगाव शहरातील व परीसरातील शेतकर्‍यांना रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई सरकार मुद्दाम करीत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आले आजच्या आज 15 ः 15 व 10ः26ः26 व 24ः24 व 16ः16 यासह रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांनी एक महिन्यांपासून नंबर लावले मात्र खते वरणगावात पुरेश्या प्रमाणात न पाठवल्यामुळे शेतकर्‍यांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, संजयकुमार जैन, शामराव धनगर, कामगार नेते मिलिंद मेढे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, हितेश चौधरी, संजय सोनार, आकाश निमकर, राहुल जंजाळे, सुनील माळी, विवेक शिवरामे, जय चांदणे, विशाल कुंभार, नरेंद्र बावणे, विक्की चांदेलकर, अनिकेत चांदखेडकर, गौरव घाटोळे यांच्यासह असंख्य शेतकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाकडून शेतकर्‍यांवर अन्याय
भुसावळ तालुक्याला आतापर्यंत पंधराशे मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला असून अद्यापही अडीच हजार टन खतांचा पुरवठा झालेला नाही. केंद्र सरकारने मुबलक खते पाठवली असलीतरी राज्यात मात्र शेतकर्‍यांना खते उपलब्ध न झाल्याने एक प्रकारे हा शेतकरी वर्गावर अन्याय महाराष्ट्र सरकार करीत आहे. शहरातील महावीर कृषी केंद्रावर तालुका कृषी अधिकारी धांडे आले असता दोन त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी धांडे यांनी गोदामाची तपासणी केली गोदामातही युरीया आढळला नाही. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी धांडे यांनी मोबाईलवर संपर्क साधून वरणगावला युरीया उपलब्ध करण्याची विनंती केली. युरीया खतांचा पुरवठा करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.निवेदनाच्या प्रती माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.

Copy