KHADSE NCP प्रवेश LIVE: खडसेंबाबत भाजपने जाणीवपूर्वक कटकारस्थान केले

0

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज शुक्रवारी २३ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विरोधी पक्षनेते असतांना खडसे यांनी आमच्यावर खूप आरोप केले, मात्र त्यांच्याबद्दल द्वेष कधीही निर्माण झाला नाही. भाजपला मोठे करण्यात खडसे यांचा मोठा वाटा आहे. कायम पहिल्या रांगेत असलेल्या व्यक्तीला जाणीवपूर्वक संपविण्यासाठी भाजपने प्रयत्न केले, जाणीवपूर्वक कटकारस्थान रचून खडसे यांना संपविण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी सांगितले.

खडसे यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली आहे. थोड्याच वेळात खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. २ वाजता त्यांचा प्रवेश होणार होता, मात्र मंत्रिमंडळाची बैठक सुरु असल्याने प्रवेश सोहळ्याला विलंब झाला आहे.

खडसे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, सतीश पाटील आदींसह जळगाव जिल्ह्यातील नेते उपस्थित आहेत.

Copy