खडसे यांच्यासोबत ७२ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज शुक्रवारी २३ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली आहे. थोड्याच वेळात खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. २ वाजता त्यांचा प्रवेश होणार होता, मात्र मंत्रिमंडळाची बैठक सुरु असल्याने प्रवेश सोहळ्याला विलंब झाला आहे. खडसे यांच्यासोबत कोण-कोण प्रवेश करणार असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्यासोबत ७२ जण राष्ट्रवादीत आजच्या दिवशी प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली आहे.

Copy