खडसे महाविद्यालयात रंगली वक्तृत्व स्पर्धा

0

मुक्ताईनगर : येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात पंचायत समिती व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सापळे यांनी आपल्या मनोगतातून स्वच्छतेचे महत्व व उपयोगिता यांचा उदाहरणादाखल प्रत्यय घडविला तर अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःपासून ते समाजापर्यंत स्वच्छतेची मोहिम चालविली तरच समाजाचा पर्यायाने देशाचा विकास साधला जाईल, असे प्रतिपादन केले.

या स्पर्धेत तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा कनिष्ठ गट व वरिष्ठ गट अशा दोन गटात घेण्यात आली. यात कनिष्ठ गटात प्रदिप जाधव, योगेश पाटील, रुचिता उज्जैनकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला तर वरिष्ठ गटात अंकिता रोकडे, जयश्री झांबरे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला तर ज्ञानेश्‍वरी वाहुळकर व नरेश पाटील यांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक मिळविला.

यांचे लाभले सहकार्य
स्पर्धेसाठी उपप्राचार्य एस.एम. पाटील, पंचायत समितीचे एस.जी. बैरागी, सपकाळे, ज्ञानेश्‍वर पाटील, मनोहर कोचुरे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे परिक्षण एस.एम. महाविद्यालयाच्या प्रा. वंदना लव्हाळे, प्रा. सी.डी. खर्चे, प्रा. एन.के. नारखेडे यांनी केले तर समन्वयक प्रा. डी.एन. बावस्कर यांनी संचलन केले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.