खडसे महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

0

मुक्ताईनगर । कार्यालयीन कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 अंतर्गत अ‍ॅड. संतोष कलंत्री यांनी महिला लैंगिक छळ व त्यासंदर्भात आधीचे कायदे ते 2013 नंतर कायद्यात झालेले बदल व त्यांची अंमलबजावणी व स्त्रियांना मिळणारा न्याय यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. जी.जी. खडसे महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी काळानुरुप स्त्रियांमध्ये बदल किती अत्यावश्यक आहे हे विविध उदाहरणातून पटवून दिले.

नैराश्य व घटस्फोट यांचा वाढता आलेख चिंताजनक
आजच्या धावपळीच्या युगात स्त्रियांनी अंधविश्‍वासू न राहता विश्‍वासार्हता पूर्णपणे तपासून घेतली पाहिजे. कामाच्या ठिकाणी तसेच समाजात वावरतांना मर्यादा उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आई, वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन आचरणात आणले पाहिजे. नियम मोडलेत म्हणजे अपघात निश्‍चित. या कृतीप्रमाणे रोग होण्याआधीच प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. अंधानुकरण न करता डोळसपणे विचार करुन निर्णय होणे गरजेचे आहे. ठराविक वयात एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे तर प्रेम म्हणजे वास्तवतेचे दर्शन याचे भान ठेवणे गरजेचे आहे. क्षणिक सुखासाठी समाधान वाढणारे प्रेम, विवाहांची संख्या व त्यातून निर्माण होणारे नैराश्य व घटस्फोट यांचा आलेख सतत वाढता आहे. ही चिंताजनक बाब आहे. याकरीता स्वतः दक्षता घेणे गरजेचे आहे. सोबतच आपले शिक्षण, प्रतिष्ठा यांचेसुध्दा जाण ठेवणे गरजेचे आहे. फक्त आधुनिकतेचा स्विकार व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण याच्याने व्यक्तिमत्वात व जीवन पध्दतीत बदल घडून आणत नाही तर तशाप्रकारचे सुसंस्कार स्विकारणे गरजेचे आहे व हिच आजच्या काळाची गरज आहे.

लैंगिक छळ प्रतिबंधक समिती गठीत
चर्चासत्र, परिसंवाद, पथनाट्य यांचे आयोजन कुन काम भागणार नाही. तर या गोष्टींचा प्रत्यक्ष आचरणात आणल्यास या विचारांची सार्थकता झाली असे म्हणता येईल. हाच संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्त आपण केल्यास समाजात घडणार्‍या लैंगिक छळांचे प्रमाण निश्‍चितच कमी होईल. मोबाईल, इंटरनेट यासारख्या माध्यमांचा वापर करणे गैर नाही परंतु तो योग्य त्यावेळीस योग्य त्या कामाला अन्यथा अन्यायाला बळी पडावे लागेल. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाअंतर्गत लैंगिक छळ प्रतिबंधक समिती गठीत करण्यात आली. या समितीचे समन्वयक म्हणून प्रा. एस.व्ही. राणे तर सदस्य म्हणून प्रा. पी.बी. ढाके, प्रा. सी.व्ही. ठिंगळे, ए.एन. पाटील, प्रमोद तायडे, बाह्य सदस्य म्हणून सतिश चौधरी, संशोधक प्रतिनिधी म्हणून प्रा. सी.ए. नेहेते, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्वप्निल पाटील, दिपाली महाजन यांची नेमणूक करण्यात आली.