खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, ‘आपण बसवून मिटवून टाकू’ : गिरीश महाजन

Khadse told Fadnavis along with me to erase it: Minister Girish Mahajan चाळीसगाव : माजी मंत्री खडसे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्य उभ्या महाराष्ट्राला ठावूक असतानाच रविवारी चाळीसगावात मंत्री महाजनांनी नाशिकच्या सभेत एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना आणि मला एक विषय मिटवून टाकू, असे सांगितल्याचा दावा केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मंत्री महाजन म्हणाले की, नाशिकच्या र्दीत तो विषय कोणता? हे मात्र आम्हाला कळलं नाही, असेही ते म्हणाले. नाशिकच्या महानुभाव पंथाचा तो कार्यक्रम होता. सभेतील भाषण संपल्यावर एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. खडसेंना नेमका कोणता विषय मिटवायचा आहे, हे मला माहिती नाही, असेही सांगायला गिरीश महाजन विसरले नाहीत.

तीन तास बसल्यानंतर अमित शहांनी भेट नाकारली
अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षा खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्यालयाबाहेरून एक फोन आला होता. यानंतर मी रक्षा खडसेंना फोन करून याबाबत विचारले. तेव्हा रक्षा खडसेंनी मला सांगितलं की, आम्ही येथे जवळपास तीन तास बसलो मात्र आम्हाला वेळ दिलेला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला, असा दावा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगावात केला.