खडसेंमुळे राष्ट्रवादीला अधिक बळकटी: गृहमंत्री अनिल देशमुख

0

शहादा: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार दौऱ्यावर आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी ते आले आहे. शहादा येथे त्यांची सभा झाली, यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बळकटी मिळणार आहे. राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत मोठी होती, मात्र अनेकांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली. मात्र आता पुन्हा पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. पाच वर्ष सरकारला कोणताही धोका नाही असा दावाही त्यांनी केला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Copy