खडसेंनी जि.प.चा एकतरी पदाधिकारी फोडून दाखवावे: जि.प.सदस्य अमित देशमुख यांचे आव्हान

0

जळगाव: जामनेर तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त माध्यमात आले आहे. मात्र ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, ते भाजपचे कार्यकर्ते नव्हते. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे रुमाल टाकून प्रवेश केल्याचे दाखविले जात आहे. हा केविलवाणा प्रयत्न असून खडसे यांनी भाजपचा एकतरी जिल्हा परिषद पदाधिकारी फोडून दाखवावे असे आव्हान भाजपचे जिल्हा परिषद सदस्य माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अमित देशमुख यांनी दिले आहे. दुपारपासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे वृत्त सोशल मीडिया तसेच विविध माध्यमातून फिरत आहे, मात्र ते कार्यकर्ते भाजपचे नव्हते असा दावा अमित देशमुख यांनी केले आहे. खडसे यांच्यासोबत कोणीही नाही हे सिद्ध झाले असतांना त्यांच्याकडून असे हास्यास्पद प्रकार होत असल्याची टीका देखील अमित देशमुख यांनी केली आहे.