खडसेंना कॅबिनेटचा दर्जा?; नियोजन मंडळावर वर्णी लागल्याची शक्यता

0

मुंबई: भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. खडसे यांना राष्ट्रवादीत कोणती जबाबदारी मिळणार?, त्यांना मंत्रीपद मिळणार का? अशी चर्चा आहे. एकनाथराव खडसे यांना कृषी मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. मात्र शिवसेना कृषी मंत्रीपद सोडायला तयार नाही. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड देखील गृहनिर्माण मंत्रीपदावर अडून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खडसे यांच्याबाबत राष्ट्रवादीत आटापिटा सुरु झाले आहे. दरम्यान एकनाथराव खडसे यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याबाबत राष्ट्रवादीत हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथराव खडसे यांची नियोजन मंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.  नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष पद देण्याबाबत चर्चा सुरु आहे. नियोजन मंडळाच्या उपाध्यक्ष पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. नियोजन मंडळात कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करून खडसे यांना ती जबाबदारी देण्याचीही तयारी राष्ट्रवादीकडून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

खडसे यांचे पुनर्वसन करणे राष्ट्रवादीसाठी मोठी जबाबदारी आहे.

Copy