खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा काउंटडाऊन; काही क्षणात होणार प्रवेश

0

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज शुक्रवारी २३ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली आहे. थोड्याच वेळात खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. २ वाजता त्यांचा प्रवेश होणार होता, मात्र मंत्रिमंडळाची बैठक सुरु असल्याने प्रवेश सोहळ्याला विलंब झाला आहे.

खडसे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, सतीश पाटील आदींसह जळगाव जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

Copy