खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0

जळगाव: माजी मंत्री नाथाभाऊ यांचे पक्षवाढीसाठी मोठे योगदान राहीले आहे. त्यांनी आणि मी सोबत काम केले आहे. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाथाभाऊंचा पक्ष सोडण्याचा निर्णय निश्चीतपणे दुर्दैवी आहे. त्यामुळे पक्षाला नुकसान आहेच पण ते क्षणिक आहे. शेवटी पक्ष हा विचारांवर आणि तत्वांवर चालत राहतो, पक्ष कधीही थांबत नाही अशा शब्दात भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशावर ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना प्रतिक्रीया दिली आहे.