“त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल”; खडसेंचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश

0

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज शुक्रवारी २३ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी खडसे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा घालून प्रवेश दिला. खडसे यांच्यासोबत ७० पेक्षा अधिक जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

“मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जयंत पाटील यांनी मला भाजप तुमच्या मागे ईडी लावतील असे म्हटले, तेंव्हा मी त्यांना भाजपने जर माझ्या मागे ईडी लावेले तर मी त्यांच्या मागे ईडी लावेल” असे म्हटले.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष दुप्पटीने वाढवेल असा शब्द यावेळी खडसे यांनी शरद पवार यांना दिला.