खडक्यात मास्क न लावले पडले महाग : सहा जणांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : तालुक्यातील खडका येथे मास्क न लावता फिरणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने गावात खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शनिवारी रात्री कारवाई केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन न करणे, संचारबंदीचे नियम तोडणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळण, तोंडाला मास्क न लावता फिरणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गावात यापूर्वीच एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला असतानाच ग्रामस्थांनी काळजी घेणे गरजेचे असतानाही काही जण मात्र नियम भंग करीत असल्याने तालुका पोलिसांनी कारवाई करीत नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

Copy