खडकेसिम येथिल तरुणी बेपत्ता

0

एरंडोल – येथे सुरु असलेल्या पीर नथ्थू बापु मियां यांच्या उरुसात आपल्या परिवारासोबत खडकेसिम येथून आलेली तरुणी राणी सरदार जोगी (19) हि मंगळवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हरवली असल्याची नोंद एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. सदर तरुणी हि खडके सीम येथील सदाशिव महादू जोगी यांची मुलगी आहे ती आपल्या दोन बहिणी व भावासह गावातील आपल्या नातेवाईकांसोबत शहरातील पीर नथ्थू बापु यांच्या उरुसात आली होती परंतु अचानक ती बेपता झाली आहे.सदर मुलीला लिहिता वाचता येत नसून ती निरक्षर आहे. तरी कोणालाही ती आढळल्यास 9765998309 व 9890140725 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तिच्या नातेवाईकांनी कळवले आहे.