खडकी, बोपोडी, दापोडीत रामनवमी उत्साहात

0

खडकी : भजन, किर्तन व भव्य शोभायात्रांद्वारे खडकी, बोपोडी, दापोडी येथे रामनवमी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खडकी येथील श्रीराम मंदिरात रविवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भावगीते, भजन, कीर्तन व महाआरती आदींचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ परिसरातील नागरिक व भाविकांनी हिरिरीने सहभाग नोंदवून घेतला.

सजीव देखाव्यांचे सादरीकरण
सांयकाळी राम, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कॅन्टोन्मेंट सदस्य मनीष आनंद, फ्रान्सिस डेव्हिड, सतिश बटेल्लु, राजेश काकडे, शिरीष रोच, विलास पंगुडवाले आदी अनेक मान्यवरांसह शेकडो रामभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. विश्‍वहिंदु परिषद व बजरंग दल दापोडी प्रखंडाच्या वतीने सायंकाळी तानाजी पुतळा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रेयस इरेवाड(राम), दिशा आगरवाल(सीता), समर्थ तांबे(लक्ष्मण), अभिषेक आगरवाल(हनुमान), वंश बरिद्दुन(बाल हनुमान) व सिद्धी इरेवाड(भारतमाता) या लहान बालकांनी या शोभायात्रेत प्रभु रामचंन्द्र, सिता, लक्ष्मण व हनुमान यांची वेषभूषा धारण करून या वेळी रामायणातील सजीव देखाजा सादर केला.

नागरिकांचा मोठा सहभाग
सुंदर आकर्षक रथ व ढोल, ताशा, झांज पथकातील पारंपरिक वाद्य या अंतर्गत काढण्यात आलेली ही शोभा यात्रा पाहण्यास नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यात्रेचा समारोप गणेशनगर येथील गणेश मंदिरा शेजारी करण्यात आला. नगरसेविका आशा शेंडगे, शेखर काटे या सह विश्‍वहिंदु परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते आदित्य शिंदे, विकिस गुप्ता, निखिल कल्याणकर, केतन बासुदकर, स्वप्निल बासुदकर, विजय इरेवाड आदी अनेक कार्यकर्ते या शोभायात्रेत सहभागी झाले होते.