खडका रोड भागात दोन वाहनांची जाळपोळ

0

भुसावळ । शहरात वाहनांच्या जाळपोळ करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. खडका रोड परिसरात 16 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरुने दोन मोटारसायकलीची जाळपोळ केल्याने यात दोन्ही वाहनांचे तर ज्या ठिकाणी वाहने लावण्यात आलेली होती त्या दुकानाचेही शेड जळाल्याने नुकसान वाढले आहे.

पोलिसांचे कारवाईकडे होतेय दुर्लक्ष
खडका रोड परिसरातील डॉ झोपे यांच्या दवाखान्या शेजारी राहणारे व पटेल कॉलनीतील रहिवाशी भगवान शंकर शेलोडे यांच्या मालकीच्या दोन मोटार सायकल क्रमांक एम.एच. 19 बी. डब्ल्यू 7386 व एम.एच. 19- एई. 4892 या गाड्या नेहमीप्रमाणे अजमेरी फर्निचर दुकानाच्या शेड मध्ये लावले होते. तर अज्ञात माथेफिरुने जाळपोळ करुन पोबारा केला. तर अजमेरी फर्निचर दुकानाचे शटरसह शेड व विद्युत नलिका पुर्णपणे जळाले या परिसरात काही दिवसांपूर्वी जाममोहल्ला व ग्रीन पार्क परिसरात रिक्क्षांनाही आग लावण्याची व काही वाहनांना जाळपोळ केल्याची घटना घडली होती. शहरात वाहने पेटविण्याचे सत्र सुरुच असून कारवाईची गरज आहे.