खडका रोड भागात आरोग्य विभागाने केले 700 घरांचे कंटेनर सर्वेक्षण

0

डेंग्यूच्या फैलावानंतर भुसावळात आरोग्य विभागाला जाग

भुसावळ- शहरातील खडकारोड भागातील दोन तरुणांना डेंग्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे या भागातील 700 घरांचे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. पालिकेच्या पथकातर्फे मच्छर प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली तसेच नागरीकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. पालिकेच्या पथकाने घरोघरी जावून नागरीकांना डेंग्यूच्या आजाराबाबत माहिती देत खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्या तसेच डेंग्यूचा डास हा शुद्ध पाण्यातच अंडी घालत असल्याने आठवड्यातून एकदा घरातील पाण्याचा उपसा करून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहनही केले

रुग्ण आढळल्याने उडाली होती खळबळ
सोमवारी शहरातील खडकारोड भागातील बी. झेड. हायस्कूल जवळील रहिवासी अबरार खलिद मनियार (वय 19) व समीर पिंजारी (वय 29) या तरुणांना डेंग्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली होती तर यापूर्वी देखील शहरातील सात रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आमच्याकडे एकाही रुग्णाचा अहवाल आला नसल्याने डेंग्यू झाला असे म्हणता येणार नाही. मंगळवारी 700 घरांचे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले असून नागरीकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

Copy