खडका येथे शेतकर्‍याची आत्महत्या

0

भुसावळ : तालुक्यातील खडका येथील 32 वर्षीय तरुण शेतकर्‍याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गिरीश कृष्णा धांडे (32) असे मृत तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. धांडे यांनी सोमवारी सायंकाळी शेतातील झाडाला असलेल्या पाईपाला गळफास घेत आत्महत्या केली व तत्पूर्वी कुटुंबियांशी संवाद साधत जीवनयात्रा संपवत असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबियांनी धाव घेतली असता धांडे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. नातेवाईकांनी धांडे यांचा मृतदेह उतरवून नगरपालिका दवाखान्यात आणला असता त्यांना मयत घोषित करण्यात आले. तपास हवालदार शामकुमार मोरे करीत आहेत.

Copy