Private Advt

भुसावळात सीआरएमएस पदाधिकार्‍यांचा माजी मंत्री खडसेंनी केला सत्कार

भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) च्या भुसावळ मंडळ सचिवपदी एस.बी.पाटील तर झोनल वर्क शॉप सचिवपदी किशोर बी.कोलते यांची नुकतीच सीआरएमएस बीजीएम, पुणे येथे निवड करण्यात आली. या निवडीबद्दल पदाधिकार्‍यांचा शनिवारी भुसावळातील माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांच्या निवासस्थानी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
सीआरएमएस पदाधिकार्‍यांचे कौतुक करताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पदाधिकार्‍यांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांना निवडीबद्दल शुभेच्छाही दिल्या. यावेळी रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, माजी नगरसेवक किरण कोलते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.