Private Advt

खडका गावात घराला आग : लाखाची रोकड जळाली

भुसावळ : तालुक्यातील खडका येथील रहिवासी दीपक सुनील फालक यांच्या गोठ्यासह त्यात असलेल्या घराला शनिवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात शुक्रवारीच कांदा विक्रीचे प्राप्त झालेले एक लाख रुपये जळून राख झाले शिवाय म्हशीचे पारडू होरपळून मृत्युमुखी पडले.

सतर्क ग्रामस्थांमुळे अन्य पशूधन सुरक्षित
परीसरातील नागरीकांनी मदत केल्याने अन्य पशुधन वाचवता येणे शक्य झालेे. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास फालक यांचे घर आणि गोठ्याला आग लागली. वेगवान वार्‍यामुळे ही आग सुध्दा सर्वत्र पसरली. दरम्यान, आगीच्या ज्वालांमुळे गोठ्यात बांधलेल्या जनावरांची सुटण्यासाठी धडपड सुरू होती. हे चित्र पाहून परीसरातील नागरीकांनी धावपळ करत गुरांना सोडवले. मात्र, एक पारडू होरपळून दगावले. शुक्रवारी विकलेल्या कांद्याचे एक लाख रूपये फालक यांना मिळाले होते. ही रक्कम घरात ठेवली होती. आगीत या रकमेसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. खडक्यातील टँकरने आग विझवण्यास मदत केली.

53500/-
55500/-